Surajkund Mela 2019
हस्तकलेच्या प्रदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुप्रसिद्ध असलेल्या हरियाणातील "सुरजकुंड मेळा 2019"मध्ये यंदा थीम स्टेट म्हणून महाराष्ट्र राज्याचा सहभाग असणार आहे... यानिमित्ताने महाराष्ट्राची कला, संस्कृती, इतिहास, खाद्य संस्कृती देश-विदेशातील पर्यटकांच्या समोर सादर केल्या जाणार असून सुरजकुंडच्या ऐतिहासिक परिसरात यंदा स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला आणि पेशवाईतील शनिवार वाडा उभारला जाणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या मेळ्याचे उदघाटन केले जाणार आहे. हरियाणा राज्य पर्यटन विभाग आणि सुरजकुंड मेळा समिती तर्फे 1987 पासून सुरजकुंड मेळा भरवण्यात येतो. दरवर्षी एका राज्याला थीम स्टेटचा दर्जा देऊनs त्या राज्याची ओळख जगाला करून दिली जाते. यंदा पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र पर्यटन मंत्रालय आणि एमटीडीसीच्या प्रयत्नातून महाराष्ट्राला या मेळ्यात थीम स्टेट होण्याची संधी मिळाली आहे. यंदा 1 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी सुरू होणारा हा 33वा आंतरराष्ट्रीय सुरजकुंड मेळा आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने देशभरातील हस्तकलांचे प्रदर्शन ए...