इफ्फी 2019: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे 50वे ऐतिहासिक वर्ष
इफ्फी 2019: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे 50वे ऐतिहासिक वर्ष, 1952 पासून सुरुवात प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांना रेड कार्पेटचा मान रजनीकांत यांना ‘आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबली अवॉर्ड’ने करणार सन्मानित इसबेला ह्युपर्ट यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान आशियातील सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवाचे अर्थात इफ्फी महोत्सव-2019चे उद्घाटन गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर उद्यापासून रंगणार असून, या महोत्सवाचे हे 50 वे ऐतिहासिक वर्ष आहे. या महोत्सवाचे गोव्यातील पणजी इथे बांबोलिम येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये उद्या दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा उद्घाटन सोहळा होणार आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. या शानदार महोत्सवासाठी पणजी सज्ज झाली असून, उद्घाटन समारंभाला प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि या महोत्सवाचे ‘आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबली ॲवॉर्ड’ या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी प्राख्यात अभिनेते रजनीकांत उपस्थित राहणार आहेत. तसेच जोहनाथन रेयेस नेयर्स हे बेकहॅम स्टार सुद्धा उपस्थित राहणार असून, बॉलिवुडचे दिग्दर्शक करण जोहर यजमान पद भूषवणार आहेत. या उ...